दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर. इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप व बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ…
लातूर: दि.२ फेब्रुवारी, २०२६ रोजी इ.१२वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य तथा शालेय समिती सदस्य श्री. विशालजी अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख, समन्वयक डॉ. सुभाष मोरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुनीता नागरगोजे तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व इ.१२ वी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची रुपरेषा व प्रास्ताविक डॉ. सुभाष मोरे यांनी केले तर प्रशासकीय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तदनंतर प्रमुख पाहुणे श्री. विशालजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छापर मौलिक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देत जीवनात सातत्य, शिस्त व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कारंजे व प्रा. अर्चना गुंजाळ यांनी केले. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयी व स्व-अनुभव मनोगताद्वारे व्यक्त केले. तदप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून; उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला व आभार प्रदर्शनाप्रसंगी प्रा. सुनीता नागरगोजे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





















