यानंद वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता c सुरळीत चालू..
लातूर: दि.१० फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ.१२वी वर्गाच्या परीक्षेला सुरुवात झाली. दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रावर विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. दयानंद शिक्षण संस्थेचे शैक्षणिक विकास अधिकारी डॉ .जयप्रकाश दरगड व महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन परीक्षेसाठी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख, समन्वयक डॉ. सुभाष मोरे, परीक्षा केंद्रप्रमुख प्रा. सिद्धेश्वर ठाकूर, कार्यालयीन अधीक्षक श्री. फैयाज पठाण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


