Dayanand Education Society's​

Dayanand College Of Commerce (Jr), Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा संपन्न

प्रजासत्ताक दिना च्या पार्श्वभूमीवर दयानंद वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशप्रेमाची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्राध्यापिकाद्वारे राज्यागीताने करण्यात आली. स्पर्धेत विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी सूर, ताल, शब्दोच्चार व सादरीकरण या निकषांवर परीक्षण केले.या स्पर्धेत कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक सादरीकरणात सहभाग नोंदवला.तसेच प्रा.नीता परदेशी, श्रीमती वर्षा जोगीरे यांनी गीत सादर केले.
वैयक्तिक गायन स्पर्धेत कु. प्रतीक्षा गायकवाड हिने प्रथम, कु.पौर्णिमा पाटील हिने द्वितीय व पूजा नरवटे पाटिल हिने तृतीय क्रमांक पटकाविला.सामूहिक गायनात दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने प्रथम व तृतीय क्रमांक तर दयानंद कला महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला.विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.प्रशांत मान्निकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यास अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ.सुभाष मोरे यांनी आपल्या मनोगतात देशभक्ती यावर आपले विचार मांडले.या कार्यक्रमास प्रा.हरीश कुलकर्णी,प्रा.वैभव माने, प्रा. आरती झुंजे परीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्रशासकिय अधिकारी प्रा. ऋतुजा देशमुख व समन्वयक डॉ.सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . सुवर्णा कारंजे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.सुनीता नागरगोजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. आमिर शेख, प्रा.राखी मणियार, प्रा.उर्मिला गायकवाड, प्रा.शेख साकिब, प्रा ज्योतिबा बडे , श्रीमती.वर्षा जोगीरे, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.