Dayanand Education Society's​

Dayanand College Of Commerce (Jr), Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

*दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात कम्प्युटर लर्निंग कोर्स सेमिनारचे आयोजन..*

आज दि.08 ऑक्टोबर, बुधवार रोजी दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ कम्प्युटर लर्निंग कोर्स
सेमिनार चे* आयोजन दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर दयानंद वाणिज्य महाविद्यालय,लातूर. प्रा.ऋतुजा देशमुख ,प्रशासकीय अधिकारी,समन्वयक डॉ. सुभाष मोरे ,द. वा. कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. अमर भुत्ते एम.के.सी.एल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ.सुभाष मोरे यांनी AI च्या युगात कम्प्युटर ज्ञान अद्यावत करून विविध व्यावसायिक ऑनलाईन व ऑफलाईन कोर्स साठी प्रवेश घ्यावा असे सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत त्या बदलाला जाणून विद्यार्थ्यांनी देखील स्वतःला डिजिटल शिक्षणाच्या दुनियेत अपडेट करावे असे सांगितले.
तसेच प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. अमर भुत्ते यांनी एम.के.सी.एल .मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्स विषयी तसेच कम्प्युटरमध्ये आपले चांगले भवितव्य कसे घडवता येईल याबाबत सखोल माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेणुका महाळंगीकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे विद्यार्थी सहभागी होते. तसेच कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते.